तुमचा टॅग आला आहे
फक्त ३ पायऱ्या, मग राइडसाठी तयार!
तुमचा टॅग सुरू करा
फोनच्या कॅमेरा ॲपमधून टॅगवरील QR कोड स्कॅन करा. दिसणारी लिंक उघडा, तुमची आणि आपत्कालीन वेळी संपर्क करायच्या व्यक्तीची माहिती भरा, मग नोंदणी पूर्ण करा.
आता तुमचा टॅग तुमच्या प्रोफाइलशी जोडला आहे. पुढच्या वेळी स्कॅन केल्यावर तुमची आपत्कालीन प्रोफाइल उघडेल.
स्कॅन करायला मदत हवी? आमचा स्कॅनर उघडा

टॅगचा कोन नीट करा
टॅग आणि क्लॅम्प जोडणारा बोल्ट ३ मिमीच्या ॲलन कीने थोडा सैल करा. कोन नीट करून बोल्ट हळूच घट्ट करा, म्हणजे टॅग जागेवर राहील. बोल्ट गरजेपेक्षा जास्त घट्ट करू नका. कोन आधीच योग्य असेल, तर बोल्ट सैल नाही ना, एवढेच तपासा.
टॅग आपोआप फिरता कामा नये. तो जागेवर स्थिर झाला की बोल्ट घट्ट करणे थांबवा; उगाच जोर लावू नका.
सीटपोस्टवर बसवा
क्लॅम्प सायकलच्या सीटखालच्या नळीवर, म्हणजे सीटपोस्टवर ठेवा. सोबत दिलेल्या दोन्ही झिप टाय क्लॅम्पमधून काढून सीटपोस्टभोवती बांधा. क्लॅम्प घसरणार नाही इतपत त्या घट्ट ओढा. मग उरलेली टोके काळजीपूर्वक कात्रीने कापा.
QR कोड बाहेरच्या बाजूला ठेवा, म्हणजे सहज स्कॅन करता येईल. टॅग आणि क्लॅम्प घसरत किंवा फिरत नाहीत ना, ते तपासा.
काही मदत हवी? Pedalink कडून मदत घ्या.
सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी साथ द्या
आणखी सायकलस्वारांना तयारीने राइडला निघता यावे यासाठी मदत करा. तुमचे प्रत्येक योगदान गरजेच्या वेळी सायकलस्वारांना मदतीशी जोडणारी सुरक्षा साधने बनवण्यासाठी वापरले जाते.
देणगीचा QR कोड डाउनलोड करा